Cart
Cart totals
| Subtotal | ₹200.00 |
|---|---|
| Shipping |
Shipping to Maharashtra. |
| Total | ₹270.00 |
कोल्हापुरी साज :
कालखंड : (१३वे–१७वे शतक)
कोल्हापूर या शहरातून या दागिन्याचा उगम झाला. यादव व बहामनी काळात सोनारांनी राजघराण्यांसाठी खास दागिने बनवले. मराठा साम्राज्य काळात घराघरात लग्नसोहळ्यांमध्ये साज देण्याची परंपरा पक्की झाली. आज कोल्हापुरी साज सोन्याबरोबर चांदी व इमिटेशन दागिन्यांमध्येही बनवला जातो. • आता हा केवळ दागिना नसून महाराष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखला जातो. एकंदरीत, कोल्हापुरी साज हा ८००-१००० वर्षांचा इतिहास असलेला दागिना आहे, जो धार्मिक प्रतीके, परंपरा, स्त्रीचे सौंदर्य व सौभाग्य यांचे प्रतीक मानला जातो.
कोल्हापुरी साजामध्ये साडेतेरा जिवे (१६ पेंडंट्स) असतात.
प्रत्येक पेंडंट देव-देवता, शुभचिन्हे आणि निसर्गाशी निगडित आहे.
स्टाईल टिप :- तुम्ही कोल्हापुरी साज पोशाखा नुसार विविध प्रकारचे घालू शकता .
- पारंपरिक लुक -पैठणी, कांजीवरम, नऊवारी ,इरकल सोबत + तोडे + नथ
- इंडो-फ्युजन आउटफिट (लाँग स्कर्ट + क्रॉप टॉप किंवा कुर्ती) सोबत ऑक्सिडाइज्ड/इमिटेशन साज घालून बोहो लूक तयार होतो.
मंगळसूत्र/ गंठन :
कालखंड : वैदिक व प्राचीन काळ (१००० BCE – ४थं शतक CE) , गुप्त काळ (४थं – ६वं शतक), चालुक्य, राष्ट्रकूट व यादव काळ (७वं – १३वं शतक), मध्ययुग (१४वं – १७वं शतक), मराठा साम्राज्य काळ (१७वे–१८वे शतक) ,ब्रिटिश काळ (१९वे शतक), आधुनिक काळ (२०वे – २१वे शतक)
अशा अनेक शतकानुशतके मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे .
मंगलसूत्रासारख्या शुभधाग्याचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेदात मिळतो. प्रथम स्त्रिया पिवळ्या धाग्यात हळदीचा गाठी बांधून घालत असत.काही काळाने सुवर्णकारांनी धाग्याऐवजी सोन्याचे पेंडंट वापरण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र व दक्षिण भारतात मंगळसूत्र परंपरेने विवाहबंधनाचे प्रतीक म्हणून प्रचलित झाले.
प्रत्येक मराठी लग्नसोहळ्यात वाटी मंगळसूत्र बांधणे ही परंपरा असते.काळ्या मण्यांमुळे नजर लागणे, करणी, वाईट शक्ती यांचा प्रभाव कमी होतो असा समज.
आता मंगळसूत्र हलके वजनाचे सोन्यात,डिझायनर, डायमंड, प्लॅटिनम, सिल्वर अशा अनेक प्रकारांत तयार होते.
स्टाइल टिप :
लांब मंगळसूत्र → लग्न, सण-वार, पारंपरिक प्रसंग.
शॉर्ट/डिझायनर मंगळसूत्र → ऑफिस, पार्टी, मॉडर्न वेअर.
पुतळी हार :
कालखंड :पुतळी हाराचा उगम मराठा साम्राज्याच्या काळात (१७व्या शतकात) मानला जातो.
पुतळी म्हणजे लहानशी मूर्ती किंवा नक्षीकाम असलेली नाणी. या हारात लहान नाणी किंवा देवी-देवतांच्या प्रतिमा (पुतळ्या) जोडलेल्या असतात म्हणून त्याला पुतळी हार म्हणतात. प्रत्येक पुतळी म्हणजे शुभ चिन्ह – देवी-देवतांचे संरक्षण व कृपा. सोने, चांदी, ऑक्सिडाइज्ड, इमिटेशन यामध्येही सुंदर पुतळी हार मिळतो.
स्टाइल टिप :
पारंपरिक लूकसाठी
. पैठणी, नऊवारी किंवा सिल्क साडीसोबत घातल्यास छान दिसतो.
. शॉर्ट लेंग्थ पुतळी हार प्लेन कॉटन किंवा लिनेन साडीसोबत घालता येतो.
. ऑक्सिडाइज्ड पुतळी हार लाँग स्कर्ट, कुर्ती किंवा वेस्टर्न टॉप सोबतही घालता येतो.
मोहनमाळ
कालखंड:शिलाहार, यादव आणि मराठा साम्राज्याच्या काळापासून (१०वे–१८वे शतक) मोहनमाळ प्रचलित आहे.
पूर्वी राजघराण्यात व श्रीमंत कुटुंबात सोनारांकडून खास बनवून घेतला जायचा.
लहान लहान गोलसर सोन्याचे मणी एकसंध रचनेत जोडून तयार केली जाते.
अजूनही लग्नसोहळ्यात वधूला मोहनमाळ खास करून दिला जातो.
स्टाइल टिप :
कोणत्याही सिल्क, पारंपरिक साडी किंवा साडीचा ड्रेस ह्यावर मोहक लुक .
तण्मणी
कालखंड :
प्राचीन भारतात मोत्यांचा वापर वैदिक काळापासून (सुमारे 1000 BCE) उल्लेखला आहे. यादव व पुढे मराठा साम्राज्याच्या काळात तण्मणी विशेष लोकप्रिय झाला.
हा दागिना प्रामुख्याने मोत्यांचा हार असतो. पांढरे किंवा थोडे गुलाबीसर मोती एकसंध ओवून माळ तयार केली जाते. हाराच्या मध्यभागी माणिक (Ruby), पाचू (Emerald) किंवा हिरा जडवलेला छोटा सोन्याचा पेंडंट / बटवा असतो. कधी कधी दुहेरी किंवा तिहेरी माळेचा तण्मणी केला जातो.
मोत्याचे हार हे चंद्राचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे मानसिक शांती आणि सौंदर्य वाढवते असा समज आहे.
राजघराण्यातील स्त्रिया मोत्यांचा तण्मणी सोन्याच्या पेंडंटसह घालायच्या.
अनेकदा वारसा म्हणून पिढ्यानपिढ्या दिला जातो.
आधुनिक डिझाइन्समध्ये पर्ल चोकर तण्मणी आणि पर्ल लॉन्ग तण्मणी लोकप्रिय झाले आहेत.
स्टाइल टिप :
. हिरवा रंग असलेला पारंपरिक पेंडंट पैठणीच्या हिरव्या-पारंपरिक बॉर्डरसोबत छान दिसतो.
. हलका सिंगल लेयर तण्मणी → कॉटन साडी, लिनेन किंवा ऑफिसवेअर कुर्तीवर मिनिमल पण ग्रेसफुल दिसतो.
चिंचपेटी
कालखंड :
चिंचपेटीची सुरुवात सातवाहन काळात झाली, (इ.स.पू. 200 – इ.स. 300) नंतर पेशवाईचा काळ (इ.स. 1700 – 1818) हा सुवर्णकाळ मानला जातो .
चिंचपेटी या दागिन्याचा आकार चिंच (इमली) च्या बियांसारखा असल्यामुळे त्याला हे नाव पडले.
चिंचपेटी ही लग्नातील दागिना मानली जात असे.कधी कधी मध्ये मोती, माणिक, पाचू घालून शोभा वाढवली जाई. पारंपरिक हार साधारण लहान उंचीचा असल्याने गळ्याशी घट्ट बसतो. आधुनिक कारागीर सोनं, चांदी, तसेच imitation ज्वेलरीमध्ये ही माळ बनवतात.
स्टाइल टिप :
. ब्राईडल लुकसाठी पेशवाई नऊवारी + चिंचपेटी + मोहनमाळ + पुतळीहार उत्तम .
. चिंचपेटीला मोत्याची लांब माळ किंवा लहानसा पेंडंट मंगळसूत्र जोडून लेयरिंग सुंदर दिसते.
कर्णफुले / झुंबर
कालखंड :
कालखंड : सिंधू-सरस्वती संस्कृती (२५०० BCE) मधील मूर्तींवर कानातले दागिने दिसतात.नंतर काळानुसार त्यात बदल घडत गेले .
कर्णफुले हे स्त्रीचे सौंदर्य, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात.लग्न, मुंज, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र अशा प्रत्येक सणात झुंबर घालणे हे रूढीप्रमाणे झाले. यात साधे छोटे स्टड, वर्तुळाकार बाली, झुंबर, कर्णफुले असे अनेक प्रकार असतात. हा दागिना स्त्रियांच्या सौंदर्याला नजाकत आणि ग्रेस देतो.
स्टाइल टिप :
. मोठे झुंबर घालताना गळ्यात फार भारी दागिना नको. नाहीतर लूक ओव्हरलोड वाटतो.
. जर गळ्यात मिनिमल ठेवले, तर झुंबर तुमचं सौंदर्य अधिक उठावदार दाखवतं.
. सर्व प्रकारच्या पोषाखावर उठून दिसतात.
बुगडी ( Ear jewellery)
कालखंड :
पेशवाई व मराठा साम्राज्याच्या काळात (१७व्या–१८व्या शतकात) कानातील बुगडी फार लोकप्रिय होती.
ही एक कानात घालायची पारंपरिक दागिना-प्रकारची वळकटीसारखी रिंग आहे.साधारणपणे सोन्याची केली जाते, पण काही ठिकाणी चांदीची किंवा मोत्यांची बुगडीही वापरली जाते. बुगडी बहुतेकदा वळणदार, गोलसर, मोत्यांनी मढवलेली किंवा कुंदन/मीनाकारी काम केलेली असते. या बुगडीला बहुधा मध्यभागी छोटासा लटकन / मणी असतो. राजघराण्यातील स्त्रिया, पेशवे काळातील बायकांमध्ये बुगडीला प्रतिष्ठेचे स्थान होते.
स्टाइल टिप :
नऊवारी पैठणी / कोल्हापुरी साडी सोबत – सोन्याची मोत्यांनी सजवलेली बुगडी खूपच खुलून दिसते.तसेच कुंदन व माणिकांनी जडावलेली बुगडी, जड दागिन्यांसोबत परफेक्ट दिसते. फ्युजन लूक साठी आजकाल लहान साईजच्या ऑक्सिडाईज्ड बुगड्या इंडो-वेस्टर्न ड्रेससोबत घालतात.
पाटल्या
कालखंड :
पाटल्यांचा प्रघात पेशवाई काळापासून (१७वे–१८वे शतक) मोठ्या प्रमाणावर दिसतो.
पाटल्या म्हणजे हातात घालायच्या जाडसर, गुळगुळीत सोन्याच्या बांगड्या. ‘’पाटल्या”हा आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांचा पारंपरिक व खूप महत्वाचा दागिना आहे. पाटल्या प्रामुख्याने सोन्याच्या बनवल्या जातात.पूर्वी पाटल्या म्हणजे केवळ दागिना नसून कौटुंबिक वारसा मानला जात असे. लग्नात नवऱ्याच्या घरच्यांकडून मुलीला पाटल्या देण्याची परंपरा होती, ती आजही अनेक घरांमध्ये टिकून आहे.
स्टाइल टिप :
. पारंपरिक नऊवारी पैठणी + हिरवा रंगाचा चूडा + पाटल्या = परफेक्ट महाराष्ट्रीयन नववधू लूक.
तोडे
कालखंड :
तोड्यांचा उल्लेख आपल्याला मध्ययुगीन काळातील मराठा साम्राज्य व पेशवाईच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसतो.
त्या काळी सोन्याच्या तोड्यांना श्रीमंती व ऐश्वर्याचे प्रतीक मानले जायचे.
तोडे म्हणजे जाडसर, वजनदार आणि आकर्षक सोन्याचे बांगडे/कडे. हे पाटल्यांपेक्षा जाड, मजबूत आणि किंचित नक्षीदार असतात. तोड्यांना सहसा फुलांच्या, वेलांच्या किंवा मोरांच्या नक्षी असते. महाराष्ट्रातील पारंपरिक वधूला पाटल्यांसोबत तोडेही देण्याची प्रथा आहे.
स्टाइल टिप :
.पाटल्या आणि तोडे एकत्र घातले की हात खूपच आकर्षक व भरगच्च दिसतो.
. नऊवारी पैठणी / सिल्क साडी + तोडे + हिरवे काचेचे बांगडे = टिपिकल महाराष्ट्रीयन नववधू लूक.
. आजच्या काळात कुर्ता किंवा इंडो-वेस्टर्न वर फक्त एक जोडी तोडे पुरेसा रॉयल टच देतो.
वाकी / बाजुबंद
कालखंड :
वाकीचा उगम प्राचीन भारतीय अलंकारशास्त्रात दिसतो.
सातवाहन, चालुक्य, यादव आणि पुढे मराठा साम्राज्य या काळात वाकी परिधान करण्याची पद्धत होती. पेशव्यांच्या काळात आणि पुढे पैठणी व नऊवारी परिधान करणाऱ्या स्त्रिया वाकी घालताना दिसायच्या.याला राजसिक व पारंपरिक दागिना मानले गेले.
स्टाइल टिप :
. पारंपरिक नऊवारी / पैठणी साडी सोबत वाकी अप्रतिम दिसते.हातात पाटल्या + तोडे आणि भुजेला वाकी – हा संपूर्ण महाराष्ट्रीयन वधू लूक होतो.
. शास्त्रीय नृत्यात याचा वापर होतो .
पैंजण
कालखंड :
पैंजणांचा उल्लेख ऋग्वेदात व नाट्यशास्त्रात आढळतो.
सिंधू संस्कृतीतील मूर्तींमध्ये स्त्रिया पैंजण घातलेली दिसतात (सुमारे 2500 BCE). मराठा व पेशवा काळात पैंजण हे विवाहातील एक महत्त्वाचे अलंकार मानले गेले.
आरोग्य फायदे – चांदीचे पैंजण शरीरातील उष्णता कमी करतात व थकवा घालवतात असे आयुर्वेदात म्हटले आहे.
संगीत व नृत्य – पैंजणातील घुंगरं चालताना नाद निर्माण करतात, ज्यामुळे ताल आणि लय टिकते
स्टाइल टिप :
.हलकी, बारीक डिझाइनची पैंजणं – रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी योग्य.
. लग्नासाठी जाडसर चांदीचे पैंजण + झुंबरं – पारंपरिक महाराष्ट्रीयन सौंदर्य.आजकाल इंमिटेशन मधे गोल्डन जाड पैंजण बनतात ते सुंदर भरदार पारंपरिक लुक देतात .
ठुशीचा उगम
कालखंड :
ठुशीचा उगम :- पेशवेकालीन कालखंडात (१७व्या-१८व्या शतकात) ठुशी हा एक गळ्यात घालण्याचा दागिना (necklace) आहे, जो लहान गोलसर मण्यांनी तयार होतो. हे मणी सामान्यतः पितळ (Brass), सोनं, किंवा सोनेरी रंगाचे मिश्रधातू वापरून बनवले जातात. हा हार गळ्याला घट्ट बसतो आणि त्याला मागे गाठकाम (adjustable dori) असते, त्यामुळे तो सहज बसवता येतो.
स्टाइल टिप :
नथ, झुंबर, पाटल्या बरोबर ठुशी परिधान केल्यास संपूर्ण महाराष्ट्रीयन लूक तयार होतो.
शृंगारातला आत्मा - पारंपरिक नथ
कालखंड : नथ परिधानाची परंपरा सातवाहन /पेशवेकालीन युगापासून आहे.
"नथ" ही संकल्पना अत्यंत समृद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. जरी मूळ "नथ" (नाकात परिधान करण्याचा दागिना) पुढील आजच्या काळात अधिक प्रसिद्ध झाला असला, तरीही सातवाहन काळात स्त्रियांनी नथसदृश अलंकार घातल्याचे पुरावे उपलब्ध आहेत - विशेषतः अजिंठा लेण्यांमधील चित्रे आणि मूर्तीमध्ये. आरोग्य फायदे :- आयुर्वेद व एक्यूप्रेशर मान्यतेनुसार, नाकाच्या ठराविक बिंदूंवर दाब देणं हे गर्भाशयाशी संबंधित आहे
स्टाइल टिप :
नथ पेअर करा पैठणी किंवा नऊवारी साडीशी. नथ घालताना केसांमध्ये गजरा आणि कपाळावर चंद्रकोर लावल्याने चेहरा उठून दिसतो तसेच मॉर्डन फ्यूजन लुक साठी सिंपल नथ एका सॉलिड रंगाच्या कुर्ता-साडी किंवा ड्रेसवर वेअर करा .